आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनपाने बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली; मिस्किनमळा परिसरातील अतिक्रमण रोखले

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापड बाजार व घासगल्ली परिसरातील पथविक्रेते व हातगाडी धारकांची अतिक्रमणे महापालिकेने गुरुवारी हटवली. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

व्यापारी महासंघाकडून बाजार पेठेतील अतिक्रमणे हटवण्याची मागणी सातत्याने होत आहे. मागील काही दिवस व्यापारी वर्गाने केलेल्या आंदोलनामुळे अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. सायंकाळी बाजारात पायी चालणेही मुश्किल झाले होते. वाहतूक कोंडी होत होती.

त्यामुळे मनपाने गुरुवारी पुन्हा मोहीम राबवली व अतिक्रमणे हटवली. वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मिस्किन मळा रस्त्यावरील मोकळ्या जागेत काहींनी खेळणी लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तक्रारीनंतर क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन काम बंद केले व अतिक्रमण हटवले.

बातम्या आणखी आहेत...