आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगमंच:उत्साहात रंगला बालरंगभूमी परिषदेचा मानसी भणगे स्मृती नाट्यछटा महोत्सव

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या “मानसी भणगे स्मृती नाट्यछटा स्पर्धा महोत्सव शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे जल्लोष होता. ह्या स्पर्धेत एकूण तीन गटात शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. नगर शहर, राहुरी, संगमनेर, जळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. ही स्पर्धा नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये उत्साहात पार पडली.

स्पर्धेचे उद्घाटन सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य आर. वाय. शिंदे, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, परिषदेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके, प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे, प्रसाद बेडेकर, परीक्षक सविता काळे, अॅड. दीपक शर्मा, नाना मोरे, देवीप्रसाद सोहोनी यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेचे संयोजन स्पर्धा प्रमुख टीना इंगळे, श्रिया देशमुख, सुजाता पायमोडे, शैलेश देशमुख, विद्या जोशी, संध्या पावसे या बालरंगभूमी परिषद कार्यकारिणी सदस्यांनी केले. तर प्रशांत सुर्यवंशी, विशाल तागड, संदीप गोसावी, शिवशाहीर शिंदे, खळेकर, काळे मॅडम यांनी सहकार्य केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला गायिका अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड, बालरंगभूमी परिषद, मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, नाट्यपरिषद नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित दळवी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता पायमोडे यांनी केले. श्रेया देशमुख यांनी आभार मानले.

स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट्र, उत्तम व उत्तेजनार्थ निकाल
गट एक : सायली गिरी व अन्वय घाटेवाल. अनन्या काळे व आराध्या गाडे. अवनी बोठे. गट दोन : मैत्रेयी मेहेर, अर्णव ढोबळे व भावना बनकर. श्रावणी वाबळे, अनुष्का कोरडे व अंकित अध्यापक. भैरवी केळकर व भव्या रसाळ. गट तीन : श्रेया देशपांडे, हर्ष बूब व महेश्वरी वाळुंज. कालिका जावळे, श्रेयस शास्त्री, सिमरन शेख व प्राची भदे. पुष्कर पंडित, गुंजन वरखडे व चैतन्य हिरे.

बातम्या आणखी आहेत...