आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:आरक्षण सोडत रद्द होऊन पुन्हा निघणार असल्याने अनेकांचे मनसुबे पाण्यात!

श्रीरामपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात सन २०२२ च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे चार गट, तर पंचायत समितीचे नऊ गणांची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्याने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. नव्याने निघणाऱ्या आरक्षणासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.नव्या रचनेनुसार आता जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण झाले आहेत. उंदिरगाव गटात १४ ग्रामपंचायती व १४ गावे येत असून २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ३०८ लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीची ८ हजार ६०५, तर अनुसूचित जमातीची ३ हजार २९८ लोकसंख्या आहे. या गटात २००२ मध्ये अनुसूचित जाती, २००७ मध्ये अनुसूचित जाती, २०१२ मध्ये सर्वसाधारण, २०१७ मध्ये अनुसुचित जमाती स्त्री, तर २०२२ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण निघाले होते. टाकळीभान गटात ९ ग्रामपंचायती व ९ गावे येत असून २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार २५४ लोकसंख्या आहे.

यापैकी अनुसूचित जातीची ७ हजार २६ तर अनुसूचित जमातीची ३ हजार ८८४ लोकसंख्या आहे.या गटात २००२ मध्ये अनुसूचित जाती, २००७ मध्ये अनुसूचित जाती, २०१२ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, २०१७ मध्ये अनुसुचित जमाती स्त्री, तर २०२२ मध्ये सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण निघाले होते. दत्तनगर गटात १२ ग्रामपंचायती व १३ गावे येत असून २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ८३ लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीची १० हजार १३३ तर अनुसूचित जमातीची ३ हजार २४८ लोकसंख्या आहे. या गटात २००२ मध्ये अनुसूचित जाती, २००७ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, २०१२ मध्ये सर्वसाधारण, २०१७ मध्ये सर्वसाधारण स्त्री, तर २०२२ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री असे आरक्षण निघाले होते.

बेलापूर गटात ८ ग्रामपंचायती व १० गावे येत असून २०११ च्या जनगणनेनुसार ३९ हजार ६०३ लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीची ६ हजार ९७७, तर अनुसूचित जमातीची २ हजार ७२१ लोकसंख्या आहे. या गटात २००२ मध्ये अनुसूचित जाती, २००७ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, २०१२ मध्ये सर्वसाधारण, २०१७ मध्ये सर्वसाधारण, तर २०२२ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग असे आरक्षण निघाले होते. निपाणी वाडगाव हा गट नव्याने निर्माण झाला असून गटात ९ ग्रामपंचायती व ९ गावे येत असून २०११ च्या जनगणनेनुसार ३९ हजार ९७० लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीची ६ हजार ३३, तर अनुसूचित जमातीची ४ हजार ४३२ लोकसंख्या आहे. २०२२ मध्ये सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...