आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये पावसाची संततधार:आतापर्यंत 109 मिलिमीटर पावसाची नोंद; अनेक रस्त्यावर साचले पाणी

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात मंगळवार अखेरपर्यंत 109 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या 24 तासांत 4.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी दुपारनंतर शहरात पावसाची संततधार सुरू होती. अहमदनगर शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील दिल्ली गेट सह सर्जेपुरा व अन्य भागातील रस्त्यावर पाणी साचले होते.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. 15 जूनपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. 20 जूनपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत 109 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या 24 तासात 4.7 पावसाची नोंद झाली आहे. पाठ फिरवलेल्या बहुतांशी तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत नगर 105 ,पारनेर 103,श्रीगोंदा 94, कर्जत 53,जामखेड 93, शेवगाव 123,पाथर्डी 143, नेवासे 133, राहुरी 126,संगमनेर 117,अकोले 123, कोपरगाव 83, श्रीरामपूर 115 व राहाता 93 मिलिमीटर पाऊस झाला आहे.