आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:बाप्पाला निरोप देण्यासाठी मान्या सिंहचे ढोल वादन

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस इंडिया २०२० मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंह सावेडी उपनगर गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली. प्रबळ इच्छा शक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर मिस इंडिया उपविजेती झालेली उत्तर प्रदेशची मान्या सिंह मोरया युवा प्रतिष्ठान मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वेशभुषेत आल्या. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी त्यांनी स्वत: कंबरेला ढोल बांधून मिरवणुकीत सहभाग घेतला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान यांनी मान्या सिंह यांचे स्वागत केले. यावेळी प्रतिष्ठानचे अपर्णा मदान, अर्चना मदान, अभिलाषा मदान, स्विटी पंजाबी, मनोज मदान, अनिता गुप्ता, स्मिता अरोरा, राजा नारंग, डॉ. विलास व्यवहारे, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...