आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:मराठा सेवा संघाने एका तरी युवकाला दत्तक घ्यावे; मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन, मान्यवरांचा करण्यात आला सन्मान

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघ ही सामाजिक चळवळ असून मराठा सेवा संघाने आता युवकांना दत्तक घेऊन शिक्षणाची क्रांती घडवण्याची गरज आहे. युवकांना दत्तक घेतले आणि त्यांना त्याच्या पायवर उभे केले, तर निश्चितच उद्याच्या काळात जिजाऊ, शिवराय, सावित्रीमाई या मुलांमधून तयार होतील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर यांनी नगर येथे कृतज्ञता सनमन सोहळ्यात बोलताना केले.

मराठा सेवा संघ आणि जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे जी. डी. खानदेशी, राजमाता जिजाऊ चित्रपट निर्मात्या मंदाताई निमसे यांना जीवनगौरव पुरस्कार व मनगाव प्रकल्प देहरे येथील डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचिता धामणे यांना कर्म तपस्वी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजी जगताप, इंजिनिअर विजय घोगरे, मुख्य अभियंता इंजिनियर प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल खेडेकर, विजय घोगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर, अभिषेक कळमकर, जी. डी. खानदेशी, मंदाताई निमसे, डॉ.राजेंद्र धामणे, डॉ. सुचिता धामणे, इंजिनियर विजय घोगरे, विजयकुमार ठुबे, सुरेश इथापे, राजेश परकाळे, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश इंगळे, प्रा. पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, किशोर मरकड, राजश्री शितोळे, काशिनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, उदय अनभुले, सीए विश्वास कारंजकर, राजेंद्र ढोणे, अशोक वारकड, जिजाऊ ब्रिगेडचे उषाताई इंगोले पाटील आदी उपस्थित होते. खेडेकर म्हणाले, एक आमदार विचारांचा झाला, तर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. विचारांचे नेते तयार झाले पाहिजे आणि यामधूनच क्रांती होणार आहे.

तसेच भविष्यात मराठा सेवा संघाचे तथा मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे यांनी युवकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर संस्था उभ्या कराव्यात, असे ते म्हणाले. केंद्रात संभाजी ब्रिगेडची सत्ता आली, तर निश्चितपणे भारतरत्न देऊन गौरवण्यात येईल. आपण त्या पुरस्काराच्या पात्रतेचे आहात, असे गौरव उद्गार खेडेकर यांनी डॉ. राजेंद्र धामणे व सुचिता धामणे यांच्याबद्दल काढले. मनोरुग्ण महिलांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. धामणे दांम्पत्यांचे खेडेकर यांनी पुरस्कार देताना कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...