आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बाजारपेठेतील अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर, पोलिस व मनपाच्या पथकाने जप्त केले साहित्य

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कापड बाजार, शहाजी रोड, गंज बाजार व मोची गल्ली परिसरात अतिक्रमण धारक पुन्हा रस्त्यावर आल्यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी दुपारी मनपाच्या पथकाने अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त केले. यावेळी कर्मचारी व अतिक्रमण धारकांमध्ये किरकोळ वादही झाले.

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अतिक्रमणधारकांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वीच व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत उपोषणही केले होते. तर, हॉकर्सने पुनर्वसनाच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला होता.

अतिक्रमणांचा वाद अद्याप शमलेला नसतानाच शुक्रवारी पुन्हा बाजारपेठेत अतिक्रमणधारक रस्त्यावर आल्यामुळे महापालिका व कोतवाली पोलिसांच्या पथकाने अतिक्रमणधारकांवर कारवाई सुरू केली. शहाजी रोड, मोची गल्ली व गंज बाजार परिसरात हातगाड्या व टेबल जप्त करण्यात आले. काही दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्यही जप्त केले. मागील दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याचे मनपा शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...