आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:कोपरगांव तालुक्यातील जनसामान्यांचा तहसीलवर जनआक्रोश; आमची लढाई ही आमदाराविरुध्द नाही तर प्रवृत्तीविरुध्द : कोल्हे

कोपरगाव शहर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे हजार कोटींच्या घोषणांचा सुकाळ आहे तर दुसरीकडे या मतदार संघातील शेतक-याला जगणं मुश्कील झालं आहे त्याचं नादुरूस्त रोहित्र महिनोनमहिने दुरुस्त होत नाही, त्याची शेती विजेअभावी देशोधडीला लागली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मतदार संघाबाबत वेगळे चित्र रंगवत आहे, मात्र माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आम्हांला संघर्षाची शिकवण देऊन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून न्यायाचा मार्ग दाखविला आहे. आमची लढाई ही आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द आहे. याच्यापेक्षाही पाच पट हजारोंच्या संख्येने शेतकरी नागरिक घेऊन मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत धडकु पण शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू, असा विश्वास कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.

कोपरगांव मतदार संघातील शेतकरी व जनसामान्यांचे प्रश्न गेल्या अडीच वर्षापासून टांगणीला पडले आहेत, विजेसह पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला आहे, निळवंडे धरण कालव्यांची कामे मार्गी लागावी, शहरवासियांसाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजना मार्गी लागावी, विस्थापित टपरीधारकांचे तात्काळ पुर्नवसन व्हावे, गोर गरीब निराधार गरजुंना रेशनकार्ड, घरकुल, संजयगांधी निराधार, श्रावण बाळ वृध्दापकाळ यासह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे त्यांच्या मागण्यांचा जनआक्रोश तसेच बससेवा पुर्ववत सुरू करावी, एमआयडीसीसाठी जागा संपादित करून ती तात्काळ सुरू करावी यासह असंख्य प्रलंबित मागण्यांचा आवाज महाविकास आघाडी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कचेरी कोपरगाव येथे जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रास्तविक साहेबराव रोहोम यांनी केले.

नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, महावितरणचे खराटे आदिंना शेतकरी, जनसामान्य नागरिक, पालक, सुशिक्षीत बेरोजगार विस्थापित टपरीधारक, निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांसह हजारोंच्या स्वाक्षरीचे निवेदने यावेळी देण्यात आले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचे काम हे महाविकास आघाडी शासन करत असुन, फसवा फसवीचा खेळ सुरू आहे. कोपरगांव मतदार संघाच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री एक हजार कोटीच्या घोषणा करतात, या शासनाची तिजोरी पैशांनी फुल्ल भरलेली आहे मात्र दुसरीकडे आमचा शेतकरी उपाशी आहे. आमच्या छोटया छोटया समस्या सोडवण्यासाठी या सरकारला वेळ नाही. तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपल्या कार्यकाळांत बसस्थानक, पोलिस ठाणे, अग्निशमन केंद्र, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका इमारत, वाचनालय, गोकुळनगरीचा पूल ही कामे पूर्ण झाली. त्याची उदघाटने आघाडी शासनाचे मंत्री करतात, तीन नापास विद्यार्थी राज्याच्या सत्तेत बसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...