आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीतीच्या 23 ते 25 जून बैठका:पंचायत राज समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषदेत माहितीची जुळवाजुळव

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या 2016 ते 2018 कालावधीतील लेखापरीक्षण पुनर्वीलोकन अहवलातील परिच्छेदांबाबत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यासाठी तसेच पंचायत समित्यांना भेटी देण्यासाठी 32 सदस्यीय पंचायत राज समिती 23 ते 25 जून कालावधीत अहमदनगर दौऱ्यावर येणार आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सवर्च विभागात फाईलींची शोधाशोध व माहितीची जुळवाजुळव करण्याची धावपळ सुरू आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायती राज समितीने जिल्हा परिषदेत 23 ते 25 जून या कालावधीत बैठकांचे नियोजन आखले आहे. समितीमध्ये 32 सदस्य असून समितीबरोबर सचिवलयाचे उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, कमर्चारी आदी 11 व्यक्ती बैठकीला उपस्थित राहणार आहेत. समितीच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात 22 ते 26 जून या कालावधीत निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विधानसभा सदस्य संजय रायमुलकर समिती प्रमुख म्हणून बैठका घेणार आहेत.

समितीत 25 सदस्य असून 8 निमंत्रीत सदस्यांसह 32 जणांचा समावेश आहे. 23 जूनला समिती जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी अनाैपचारिक चर्चा करणार आहे. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता 2016-2017 व 2017-2018 वर्षातील लेखा परीक्षा पुनर्वीलोकन अहवालातील जिल्हा परिषेदेच्या संबंधांतील परिच्छेदांबाबत मुख्यकार्यकारी अदिकाऱ्यांची साक्ष घेणार आहे. 24 जूनला जिल्ह्यातील पंचायत समित्या, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतींना समिती भेट देणार आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांचीही प्रश्नावलीसंदर्भात साक्ष नोंदवली जाईल. तर शनिवारी (25 जून) 2018-2019 वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालाबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवणार आहे. दरम्या, जिल्हा परिषदेतील सर्व विभागांनी पंचायत राज समितीच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कर्मचारी माहिती जमा करण्यात तसेच जुन्या नोंदी तपासण्यात व्यस्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...