आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:व्यायामशाळेला दिले आठ लाखांचे साहित्य

जामखेड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील जय हनुमान व्यायाम शाळेला आमदार रोहित पवार यांच्या वतीने आठ लाख रुपये किमतीचे आधुनिक जिम साहित्य देण्यात आले. ७ रोजी दिघोळ येथे व्यायामशाळा व साहित्याची पहाणी आमदार रोहित पवार यांनी केली.

यावेळी जय हनुमान व्यायाम शाळा वस्ताद वसंत रसाळ, उपसरपंच भारत शिंदे, युवा नेते पहेलवान सुरज रसाळ, धीरज रसाळ, तय्यब शेख, महेश राजगुरू, गणेश अंकुश, समीर आतार, काका राजगुरू, नागनाथ उमाप, रविकिरण गायकवाड, नंदू नाना शिंदे, सागर अंकुश, ओंकार काशीद, सुधीर गायकवाड, महादेव राजगुरू, नारायण कोचाळे, गणेश आटकरे, सुलतान शेख, कृष्णा राजगुरू, अमर कोचाले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी व्यायाम शाळेला आधुनिक जिम साहित्य दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिघोळच्या हनुमान व्यायाम शाळेला नवीन इमारत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.

बातम्या आणखी आहेत...