आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता, केव्हाही पाऊस, बर्फ पडतो. पाणीटंचाई, ढगफुटी, दरडफुटीच्या घटना जगभर वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. शेतातील माती नापीक झाली आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जागतिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. हे सर्व पर्यावरणातील अचानक बदलामुळे होत आहे. यामुळे ‘माती वाचवा’ अभियान जगभर राबवले जात असून, त्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.
सावेडीतील महाराष्ट्र पब्लिक स्कूल व महाराष्ट्र कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. डॉ. पवार यांनी बक्षिसे मिळविलेल्या मुलांचे अभिनंदन करतानाच, ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनाही प्रोत्साहित केले. महाराष्ट्र पब्लिक स्कूल, महाराष्ट्र कॉलेजच्या विविध खेळात व स्पर्धामध्ये प्राविण्य मिळालेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, “आयुष्यात चांगले यश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला खावा.
‘फास्ट फूड’ न खाता, चांगला भाजीपाला व रोटी असा आहार घ्यावा. योग व प्राणायाम दररोज केल्यास आयुष्यात खूप चांगली प्रगती करता येते. मोठ्या स्थानावर पोहचू शकता येते.” संतुलित आहार व खेळ आणि व्यायाम हेच आरोग्य समस्यांमधून मुक्ती देऊ शकतात. महाराष्ट्र पब्लिक स्कूल, महाराष्ट्र कॉलेजने अल्पावधीतच चांगले शिक्षण-प्रशिक्षण देऊन नावलौकिक वाढविल्याचे डॉ. बापूसाहेब कांडेकर म्हणाले. शाळा व महाविद्यालयातील ११० विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, वादन, ड्रामा व इतर कलाकृती सादर केल्या.
यांना मिळाली बक्षिसे
क्रिकेट टीम- कॅप्टन जोसेफ वडागळे, कबड्डी विनर टीम- कॅप्टन ओम ठोकळ, मुली - सृष्टी धाकतोडे, खो-खो विनर टीम- कॅप्टन युवराज आढाव आणि साक्षी प्रजापत, गौरव जरे. सायन्स प्रकल्प प्रदर्शन : जान्वी कुऱ्हे व इफ्रा सय्यद - रिसायकलिंग पेपर, वैष्णवी तनपुरे - ऑपरेशन लंग्ज, आरुषी सिंग - स्मार्ट सिटी प्रकल्प.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.