आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष व्यक्त:नगरमध्ये मविआ मान्य नाही; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी विरोधात असंतोष व्यक्त

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षाचा महापौर असूनही मनपामध्ये राष्ट्रवादीचे आमदारच सर्व कारभार करतात. महाविकास आघाडीमुळे पक्षावर मर्यादा पडतात. शहरात स्वर्गीय अनिलभैय्या राठोड यांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असलेली महाविकास आघाडी शहरात मान्य नाही, अशा शब्दात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध असंतोष व्यक्त केला.

शासकीय विश्रागृहावर झालेल्या बैठकीत युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरुद्ध रोष व्यक्त केला. महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक आपल्याच प्रभागात नारळ फोडायला घाबरतात. नारळ फोडला तर ठेकेदारावर दबाव येऊन काम बंद पडते, अशा विविध तक्रारी करत आम्हाला शहरात महाविकास आघाडी नकोच, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. पक्षाच्या नेतृत्वावर टीका होत असताना शहरातील प्रमुख पदाधिकारी त्याला उत्तर देत नाहीत, आमदार संग्राम जगताप व खासदार सुजय विखे यांच्याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही, याकडे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ही बाब पक्ष नेतृत्वाच्या नजरेस आणून दिली जाईल. त्यांच्या कानावर हा प्रकार घातला जाईल. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे मतभेद असू शकतात, चर्चेने हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. राष्ट्रवादीच्या आमदारांशी याबाबत चर्चा केली जाईल. निर्माण होणारे गैरसमज पक्ष नेतृत्व व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिले जातील, असे आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षातील पदाधिकारी बदलाची मागणी झाली नसली, तरी सक्रिय व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन करावे लागणार आहे. गुणवत्ता असणाऱ्या शिवसैनिकांची पदावर नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी तो ठराव राखून ठेवला
३२ कोटींच्या जागा खरेदीसंदर्भात पक्षावर शिंतोडे उडू नयेत, यासाठी व मनपाचेही आर्थिक नुकसान होऊ न देता, नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी अन्य मार्ग शोधले जातील. या ठरावास सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला आहे. त्यामुळे एकट्या शिवसेनेचा यामध्ये दोष नाही. महापौरांनी हा ठराव आता राखून ठेवला आहे, असेही संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...