आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय साहित्य; रुग्णांना फळ, कपडे देत शिक्षक दिन साजरा

राहाता23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय साहित्य व रुग्णांना फळ, कपडे देत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राहाता पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र डॉ. बापुसाहेब पानगव्हाणे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे व माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने उपस्थित होते.लोंढे म्हणाले, शिक्षक हे सेवेत असतांना ज्ञानदान करीत असतात. परंतू सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जाणिवेतून शिक्षकदिनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी फळे व उपयुक्त साहित्य दान देणे हा स्तुत्य उपक्रम आहे.

डॉ. पानगव्हाणे म्हणाले, अशा उपक्रमाबद्दल सर्व सेवानिवृत्त शिक्षक हे अभिनंदनास पात्र आहेत. डॉ. गोकुळ घोगरे यांनी या उपक्रमाचे कौतूक करुन या मदतीबद्दल सर्वांचे रुग्णालयातर्फे कौतुक करुन या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले. शिक्षकांच्या वतीने प्राचार्य नानासाहेब मते व भिवसेन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सर्जेराव मते यांनी केले. प्रसुतीगृहातील महिलांच्या बालकांना कपडे, पीस, फळे तर इतर रुग्णांना टॉवेल व फळांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासाठी दोन पल्स ऑक्सिमीटर फिंगर टीप यंत्रे डॉ. गोकुळ घोगरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. जहागीरदार, डॉ. पार्थ घोगरे,डॉ. घोगरे, डॉ. बनसोडे, डॉ. शुभांगी काणे, डॉ. विजय म्हस्के, डॉ. संजय उबाळे, बाबासाहेब गाडेकर, रामनाथ सदाफळ, आदी उपस्थित होते सुत्रसंचालन सर्जेराव मते यांनी केले तर आभार मनोहर बोरुडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गुंजाळ, नानासाहेब गाडेकर, राजेंद्र बंगाळ, अरुण तुपे, सी.आर.गमे, नानासाहेब नळे, बी.डी.गमे, सुभाष जोशी, जलसंपदाचे पंढरीनाथ काकडे, प्रमोद तोरणे, मंडलिक शिलेदार, शंकरराव जेजूरकर, आर. जी. गमे, लालचंद आसावा, जानकीनाथ पांढरकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...