आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची आज हिवरेबाजार येथे सभा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची राज्य केंद्रीय कार्यकारिणीची सभा रविवारी (४ डिसेंबर) आदर्शगाव हिवरे बाजार येथील ग्रामीण पर्यटन केंद्रात होणार आहे. युनियनचे अध्यक्ष बलराज मगर सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

सभेत पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. बैठकीत जिल्हा परिषदेचा सुधारित आकृतीबंध, लिपीक वर्गीय कर्मचारी पदोन्नती स्तर कमी करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच तारखेच्याआत निवृत्तीवेतन जमा करणे आदी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, जिल्हाध्यक्ष अभय गट, सचिव मनोज चोभे, सुहास गोबरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...