आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची सभा:पोटनियम दुरूस्तीवरून गाजणार सभा; सत्ताधाऱ्यांची 10 टक्के लाभांशाची शिफारस, विरोधक धारेवर धरणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पोटनियम दुरूस्तीचा विषय ठेवण्यात आला आहे. तसेच सभासदांसाठी 10 लाभांशाची शिफारसही करण्यात आली आहे. परंतु, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, सत्ताधारी मंडळ धुळफेक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे रविवारी 5 जूनला होणारी सभा विविध मुद्द्यांवर गाजण्याची चिन्ह आहेत.

संस्थेची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. 5) सकाळी 11.30 वाजता नगरमधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार आहे.

संस्थेचे चेअरमन विलास शेळके म्हणाले, 2021-2022 या आर्थिक वर्षात संस्थेला 7 कोटी 78 लाखांचा ढोबळ नफा झाला असुन 1 कोटी 62 लाखांच्या तरतूदी व कायम निधीवरील व्याजाची रक्कम 3 कोटी 22 लाख 92 हजार वजा जाता 2 कोटी 93 लाख 46 हजार 378 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असे सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर असणार आहेत. सभेत संचालक मंडळाने सभासदांच्या 31 मार्च 2021 च्या शेअर्सवर 10 टक्के लाभांशाची शिफारस केली आहे तसेच कायम निधी वरील व्याज 9 टक्के देणार असल्याबाबत सांगितले तसेच संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोटनियम दुरुस्तीचा विषय ठेवण्यात आला आहे.

डिव्हिडंड व व्याजाची रक्कम सभा झाल्यानंतर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे व्हाईस चेअरमन काशिनाथ नरोडे यांनी सांगितले.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुला-मुलीना पारितोषिक वितरण, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे अशी माहिती संचालक संजय कडूस यांनी दिली. दरम्यान, विरोधक सुभाष कराळे यांनी सत्ताधाऱ्यांचा कारभार सभासदांच्या डोळ्यात धुळ फेक करणारा आहे. सभेत आम्ही सभासद हिताच्या योजना मांडू पण सभासद हिताचे निर्णय कोणी घेत असेल तर ते हाणून पाडू असे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

दरमहा 500 रूपये कायम ठेवीचा घाट

विरोधी मंडळ नेते सुभाष कराळे म्हणाले,​​ शिफारस केलेला 10 टक्के हा सर्वात कमी लाभांश आहे. आम्ही आमच्या कार्यकाळात 12 ते 15 टक्क्यांपर्यंत लाभांश दिला होता. कायम ठेवीवरील व्याजदर 10 टक्क्यांच्या पुढे होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी ठेवीवरील व्याजदर तीन वर्षांपासून साडेसात टक्केच ठेवला. तर कायम ठेवीचा 9 टक्के ठेवला. आम्ही सभासद कल्याण वर्षात एकदाच 1800 ते 2000 हजार रूपये जमा करत होतो, पण सत्ताधाऱ्यांनी दरमहा 500 रूपये घेण्याचा घाट घातला आहे. वर्ग 4 सभासदाला अडचणीचा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...