आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:धोबी-परिट आरक्षणाच्या प्रश्नावर आज बैठक ; आरक्षणामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धोबी समाज भारतातील ११ राज्यांमध्ये ओबीसी प्रवर्गात तर उर्वरित १८ राज्यांमध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे. त्यामुळे मोठा संभ्रम या समाजात निर्माण झालेला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (८ नोव्हेंबर) हैद्राबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी धोबी समाजातील महाराष्ट्रातील नेते जाणार आहेत. अशी माहिती धोबी- परीट आरक्षण समन्वय समितीचे महासचिव शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीत ओबीसी आरक्षण व अन्य राज्यातील स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. असे शिंदे यांनी सांगितले.महाराष्ट्रात धोबी-परीट समाज ओबीसी मध्ये आहे. अन्य राज्यात अनुसूचित जातीत धोबी समाजाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...