आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचारी:सभासद कर्ज मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली ; वार्षिक सभेत मनपा कर्मचारी पतसंस्थेचा निर्णय

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सभासदांची कर्ज मर्यादा तीन लाखांवरुन पाच लाख करण्यात आली. सभेत सर्व विषयाला एकमताने मंजुरी दिली गेली. सभेस चेअरमन गंगेकर, व्हाईस चेअरमन प्रमिला पवार, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, संचालक सतीश ताठे, संचालक बाबासाहेब मुदगल, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, श्रीमती उषाताई वैराळ, किशोर कानडे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदींसह सभासद उपस्थित होते. चेअरमन गंगेकर म्हणाले, पतसंस्थेच्या सभासदांचे हित जोपासण्यासाठी संचालक मंडळ विविध निर्णय घेत आहे. पतसंस्था स्वभांडवली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळेच सभासदांना मोठा फायदा झाला. कोरोना काळामध्ये सभासदांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सुमारे सहव्वीस लाख कर्ज माफ करण्यात आले. सभासदांच्या आजारपणासाठी पतसंस्थेने आर्थिक मदतीचा धनादेश सभासदांना सुपूर्त केला आहे. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. तातडीची कर्जमर्यादा २० हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात आली आहे. सभासदांच्या मुला-मुलींना शिक्षणामध्ये मार्गदर्शनासाठी मोफत अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...