आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:राहुरी कृषी विद्यापीठ व केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत सामंजस्य करार, नॅनो गंधकाचा खत म्हणून वापरासाठी होणार संशोधन

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांच्यामध्ये नॅनो गंधकाचा खत म्हणून वापरासाठीच्या संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील तसेच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता सक्सेना यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोककुमार भारीमल्ला, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, शास्त्रज्ञ डॉ. मनोज महावर व डॉ. अनिल दुरगुडे उपस्थित होते. या करारामध्ये केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांनी नॅनो गंधक तयार केले. नॅनो गंधकाचा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम संदर्भात तीन वर्षांसाठी घेण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात प्रयोगांचा अभ्यास करणे तसेच तेलबिया पिकांसाठी लागणाऱ्या गंधकाच्या मात्रा नॅनो खतांच्या माध्यमातून कसा वापरता येईल, याबद्दल संशोधन होणार आहे. हा करार कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई येथे नॅनो खतांच्या संदर्भातील संशोधन कार्याचे तसेच त्या संस्थेच्या होणाऱ्या प्रगतीची प्रशंसा करत हा करार शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. सुजाता सक्सेना यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील विविध क्षेत्रातील संशोधन कार्याचे तसेच प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे मान्य केल्याबद्दल कुलगुरु डॉ. पाटील व शास्त्रज्ञांचे आभार मानले. शास्त्रज्ञ डॉ. मनोज महावर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...