आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:राहुरी कृषि विद्यापीठ व इस्राईल पर्यटन मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इस्राईल सारख्या देशांना निर्यातीसाठी चालना मिळू शकेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

राहुरी कृषि विद्यापीठ व इस्राईलच्या पर्यटन मंत्रालय यांच्यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते.कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले इस्राईल देशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने एकूण क्षेत्रफळाच्या २० टक्के क्षेत्रावर शेती केली जात आहे. या सामंजस्य करारामुळे इस्राईल देशातील कृषि क्षेत्रात केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना होणार आहे. इस्राईल पर्यटन मंत्रालयाचे संचालक सॅमी याहिया यांनी इस्राईल देशात होत असलेल्या अतिप्रगत इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञान, कृषि क्षेत्रातील स्वयंचलन सेन्सर्स व नियंत्रण पद्धती, जैविक कीडनाशके याबद्दल तर इस्कॉनचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुष्करणा यांनी अनुभवात्मक शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगुन इस्राईलमधील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली.

या सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठातील विविध शाखेतील २० ते ५० विद्यार्थी ७ ते १० दिवसांच्या कालावधीसाठी अनुभवावर आधारित शिक्षण घेण्यासाठी इस्राईल देशात जाऊ शकणार आहेत. या कार्यक्रमास संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. महानंद माने, डॉ. उत्तम चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...