आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर मर्चन्टस् बँकेवर खातेदार, सभासदांच्या असलेल्या दृढ विश्वासामुळेच ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अहवाल वर्षाअखेर बँकेची कर्ज ८३७ कोटींची झालेली आहेत. सन २०२०-२०२१ सालामध्ये बँकेस १६ कोटी ७५ लाखांचा ढोबळ नफा झालेला असून तरतुदी वजा जाता ५ कोटी २२ लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत यांनी दिली.
अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप बँकेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी बँकेच्या मार्केट यार्ड येथील प्रधान कार्यालयात झाली. ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्सद्वारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुभाष बायड, संचालक व संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, श्रीमती मीनाताई मुनोत, प्रमिलाबाई बोरा, विजय कोथिंबीरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजेश झंवर, कर्मचारी संचालक संदीप लोढा व अनंत होशिंग व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन भंडारी उपस्थित होते.
चेअरमन मुनोत म्हणाले, अहवाल साली बँकेच्या ठेवी ११७ कोटींनी वाढून त्या १३७१ कोटींच्या झालेल्या आहेत. कोविड-१९ च्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये खातेदारांचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून बँकेने १६ जुलै २०२१ पासून व्याजदर देखील कमी केलेला आहे. २५ लाखांपर्यंतचे वाहन कर्ज व सोनेतारण कॅश क्रेडिटचे व्याजदर ८ टक्के केलेले आहे. तर नवीन २५ लाखापर्यंतचे गृह तारण कर्जाचे व्याजदर दसादशे ७ टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहे. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर दसादशे १२ टक्के व भारताबाहेरील शैक्षणिक कर्जाचा व्याजदर दसादशे १० टक्के केल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे वसुल भागभांडवल रक्कम रुपये १९ कोटी ४ लाखांचे असून राखीव व इतर निधी १५९ कोटी ३८ लाखांचे आहेत. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या नफावाटणीप्रमाणे बँकेचा राखीव व इतर निधी १६३ कोटी २० लाखांचे होईल. गत आर्थिक वर्षअखेर आपल्या बँकेचा सीआरएआर १३.६७ टक्के आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक २५२ कोटी ७० लाखांची आहे तसेच इतर गुंतवणूक व मुदत ठेवी २८२ कोटी ०२ लाखांच्या आहे. यावरून बँक भक्कम अशा आर्थिक पायावर उभी आहे. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन भंडारी यांनी सभेची नोटीस वाचून दाखविली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. आभार व्हाईस चेअरमन श्री. सुभाष बायड यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.