आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील १३२ कोटी रूपये खर्चाच्या भुयारी गटार कामाची तांञिक मंजुरी मिळवुन देण्याचे काम पालकमंञी राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केल्याचे लेखी पुरावे आमच्याकडे आहेत. सत्ता असताना या योजनेबाबत काहीच करता आले नाही, अशी मंडळी निव्वळ फार्स करत असल्याचा आरोप तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस सरकारने भुयारी गटार कामासाठी १३२ रूपये खर्चास तांञिक मंजुरी दिली. पंधरा दिवसापुर्वी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी या कामाची माहिती दिली. माञ आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडुन केला जात असल्याचे जाहीर केले.
चाचा तनपुरे यांनी पुरावे द्यावेत निव्वळ चर्चा करून दिशाभुल करू नये, असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांना दिले. आगामी निवडणुकीला सामोरे जाणार किंवा नाही हा निर्णय आमचा गट ठरवेल याबाबत इतरांनी उठाठेव करू नये, असे रावसाहेब तनपुरे यांनी स्पष्ट केले. दादा पाटील सोनवणे यांनीही या कामाचे श्रेय विद्यमान सरकारलाच दिले.
शहरातील नागरी सुविधांची वाताहत झाली आसुन डेंगुने तरूणाचा मृत्यू झाला असताना नगर परिषद प्रशासनास जाग आली नाही. शहरात गाळ मिश्रित पाणी पुरवठा होत असून आजाराचे रूग्ण वाढत असल्याची माहिती माजी नगरसेवक नितीन तनपुरे, विक्रम भुजाडी, आण्णासाहेब शेटे, अक्षय तनपुरे, सोन्याबापु जगधने यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.