आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थी देश विदेशात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. माजी विद्यार्थी चंद्रमोहन निबे बेंगलोर सारख्या मेट्रो सिटीत फार्मसी कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे. या माजी विद्यार्थांकडून प्रेरणा मिळावी म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाला माजी विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील प्रवरा हायस्कुलच्या वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बायकॉन प्रा. लि. बंगलौरचे कार्यकारी अधिकारी आणि माजी विद्यार्थी चंद्रमोहन निबे यांच्या उपस्थितीत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोक आसावा, प्रवरा बँकेचे संचालक आबासाहेब राऊत, संभाजी देवकर, कर्नल भरतकुमार, संस्थेचे शिक्षण सहसंचालक नंदकुमार दळे, प्रशांत खर्डे, इलियास शेख, प्रकाश पारखे, सुनिल गागरे, प्राचार्य सुधीर मोरे आदी उपस्थित होते.
शालिनी विखे म्हणाल्या, पद्मश्रींनी सुरु केलेल्या शैक्षणिक संस्था डॉ. बाळासाहेब विखे यांनी पुढे नेताना सामान्य जनतेची मुले पुढे जात आहेत. कोरोना काळात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पार्टील यांनी शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवळत देण्याचा निर्णय राज्यात प्रथम घेतला. दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्याच्या उपजत कला-गुणांना संधी आणि माजी विद्यार्थ्यांचे संघटन यामुळे संस्थेतून आदर्श विद्यार्थी घडत असल्याचे सांगून ग्रामीण भागात संस्थेच्या शैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने उभा आहे.
प्राचार्य सुधीर मोरे यांनी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांनी केला. सुत्रसंचालन सोहम शिंदे, कृष्णा काळे, तनुश्री शिंदे यांनी तर आभार प्राथमिक विभागाच्या प्रमुख यु. आर. आहेर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.