आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान‎:अमरनाथ विद्यालयात‎ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान‎

कर्जत‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री अमरनाथ माध्यमिक व‎ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या‎ विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी निवड‎ झाली. शासकीय- निमशासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी.‎ बी. एस. साठी निवड झालेल्या‎ विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने‎ सत्कार करण्यात आला.‎ ऋषिकेश नानासाहेब देशमुख,‎ सोहम सुनील शेळके , आम्रपाली‎ सूर्यकांत सराेदे, तन्मय दत्तात्रय‎ दळवी, साक्षी अशोक खराडे,‎ ओंकार विनोद खुरंगळे या‎ विद्यार्थ्यांचा सत्कार करून‎ अभिनंदन करण्यात आले.‎

कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्या‎ पी. एम. सोनवणे, पर्यवेक्षक पी. एन.‎ आवारे, उपप्राचार्य एस. बी.‎ वाघमारे, मुख्याध्यापक ए. आर.‎ भोंडवे व सर्व शिक्षक, शिक्षिका‎ आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित‎ होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे यशवंत‎ शिक्षण संस्थेचे संस्थापक मानद‎ सचिव शिवाजीराव लांगोरे, संस्थेचे‎ अध्यक्ष किरण पाटील , संस्थेचे‎ सचिव नंदकुमार लांगोरे, खजिनदार‎ रविशेठ पाटील, विश्वस्त‎ अभयकुमार पाटील,उमेश लांगोरे‎ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...