आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:30 किमी सायकल रॅलीतून पर्यावरण आरोग्य रक्षणाचा संदेश; अहमदनगर सायकलिंग क्लबचा उपक्रम

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिन आणि सायकल दिनाचे औचित्य साधून अहमदनगर सायकलिंग क्लबच्या वतीने रविवारी 5 जून रोजी 30 किलोमीटर सायकल रॅली काढून हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

जनजागृती करण्याचा प्रयत्न

प्रोफेसर कॉलनी चौक ते देवदरी रिसॉर्ट, आगडगाव व पुन्हा प्रोफेसर कॉलनी चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सायकल चालवण्याबबत जगजागृती करण्यासाठी तसेच शहरातील सायकलिंग आणि सायकलस्वारांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गौरव फिरोदिया,कल्याणी फिरोदिया, मेहेरप्रकाश तिवारी, रवी पत्रे, जितेश माखिजा, श्रीकांत लढ्ढा, दिनेश संकलेचा, महेश मुळे, प्राची कळमकर आदी उपस्थित होते.

राबवला अनोखा उपक्रम

आपले आरोग्य चांगले रहावे, इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलस्वाराच्या सायकलीवर ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा, अशा घोषणा असलेले स्टिकर चिकटवण्यात आले होते. कोरोनाच्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी आहे.

रॅलीत 70 जणांचा सहभाग

या रॅलीमध्ये अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या 70 जणांनी सहभाग घेतला. ही रॅली प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक मार्ग देवदरी रिसॉर्ट व पुन्हा याच मार्गाने परत येऊन प्राेफेसर कॉलनी चौकात समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...