आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा:म्हाळुंगी ; आढळा नदी दुथडी भरून वाहू लागली

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. व त्यात उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, बुधवारी रात्री तालुक्यात दूरवर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गासह नागरिक चांगलेच सुखावले. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पावसाने रस्ते व शेत जलमय झाले होते. तर म्हाळुंगी व आढळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रवरेला पूर आला आहे आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तालुक्यात बुधवारी ५८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यावसायिकांची धांदल उडाली होती. उपनगराच्या अनेक भागात पाणी साचले होते. काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना उभारी मिळणार आहे. भोजापूर धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदी काठच्या काही घरात पाणी शिरले होते. शहरपालिकेने नागरिकांना मदत केली. घोडेकर मळ्यात जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना अडचणी आल्या. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, म्हाळुंगी नदीला आलेल्या पाण्याचे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी पूजन केले.

बातम्या आणखी आहेत...