आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा:म्हस्के विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, काकासाहेब म्हस्के प्राथमिक विद्यालय, नागापूरमधील पाचवी इयत्तेतील ७ विद्यार्थी पात्र झाले. पैकी दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

अनुश्री राहुल गुगळे व भक्ती विशाल घटे या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना सविता दहातोंडे, अंजली औटी, विजया साबळे, राजेंद्र पठारे, सुमेध मेढे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, पं. स. सभापती डॉ. क्षितिज घुले, कारभारी नजन, मुख्याध्यापिका सुनंदा धामणे, प्राचार्या शीतल बांगर आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...