आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:कार झाडावर धडकून झालेल्या अपघातात मायलेकींचा मृत्यू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात माय-लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी नगर-जामखेड रोडवरील निंबोडी (ता. नगर) शिवारात घडली. या अपघातात कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत. विनिता दीपक उघडे (वय २६) व मुलगी रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्ष, रा. मुलुंड, ठाणे) अशी मृतांची नावे आहेत. तर कार चालक दीपक सुधाकर उघडे (वय ३३, रा. मुलुंड ठाणे), प्रथमेश रामचंद्र कनोजिया (वय ३१, रा. खडकी, पुणे) व एक जखमी आहे.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून मुंबईकडे जात होते. ते निंबोडी शिवारात आल्यावर त्यांच्या ताब्यातील कारचा ताबा सुटून कार लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना कळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंखे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...