आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लिफ्टच्या बहाण्याने मायलेकींना लुटले ; दीड लाखांचा ऐवज लंपास

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने माय-लेकीला दीड लाख रुपयांना लुटण्यात आले. नगर शहरातील चांदणी चौक ते वाळुंज (ता. नगर) या प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पल्लवी प्रथमेश चिंचले (वय ३०, रा. सूर्या पार्क, आरटीओ ऑफिस जवळ, नाशिक) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चिंचले व त्यांच्या आई सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब या ठिकाणी नातेवाईकांकडे जाण्यासाठी अहमदनगरमध्ये आल्या होत्या. अहमदनगर शहरातील चांदणी चौकात गुरूवारी सकाळी १० वाजता त्या आई समवेत वाहनाची वाट पाहत उभे होत्या. त्यावेळेस विना क्रमांकाच्या दुचाकीवरील व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन थांबला. त्यांना कोठे जायचे अशी विचारणा करून दुचाकीवर त्यांना लिफ्ट दिली.

दुचाकी वाळुंज (ता. नगर) शिवारात रेल्वे लाईन जवळ आली असता, निर्जनस्थळी दुचाकी त्याने थांबवली. पल्लवी चिंचले आणि त्यांच्या आईला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. गळ्यातील सोन्याची चैन, कानातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड असा सुमारे १ लाख ४१ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला. पल्लवी चिंचले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक साळुंके या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...