आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौऱ्यावर:मंत्री गडकरी शुक्रवारी नगर जिल्हा दौऱ्यावर ; महामार्गांच्या प्रकल्पांचा आढावा घेणार

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते -वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी शुक्रवारी (१७ जून) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, शुक्रवारी दुपारी विशेष विमानाने दिल्लीहून गडकरी शिर्डीकडे प्रयाण करणार आहेत. शिर्डी येथे रात्री साडेसात वाजता गडकरी शिर्डी, अहमदनगर, औरंगाबाद विभागातील महामार्गांच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान अकोले येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सत्कार सोहळ्यासाठी गडकरी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी दिल्लीहून विशेष विमानाने केंद्रीय नितीन गडकरी शिर्डीत दाखल होणार आहेत. शिर्डी येथून अकोले येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सत्कार सोहळा व मेळाव्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...