आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पारनेर:ग्रामपंचायतींवर प्रशासक मुद्द्यावर मंत्री मुश्रीफ भेटले; अण्णांचे झाले निम्मे समाधान

पारनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हा काही भारत-पाक वाद नाही'

ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर सोमवारी निकाल दिला जाईल. त्यानंतरच शासन निर्णय घेईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुश्रीफ यांच्या भेटीने आपले निम्मे समाधान झाले आहे, अंमलबजावणीनंतर उरलेले होईल, असे हजारे यांनी स्पष्ट केले.

हजारे, मुश्रीफ तसेच आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांच्यात शुक्रवारी राळेगणसिद्धीत चर्चेत प्रशासक व ग्रामविकासावर चर्चा झाली. त्यानंतर अण्णा म्हणाले, प्रशासक पक्षाचा नसावा, अधिकारी किंवा कर्मचारी असावा हे घटना सांगते, मी सांगत नाही.

हा काही भारत-पाक वाद नाही
आंदोलन करणार का? असे विचारले तेव्हा अण्णा म्हणाले, आंदोलनापेक्षा अशा चर्चेतून निश्चित मार्ग निघेल. आंदोलन करण्यासाठी हा भारत-पाकिस्तानमधील वाद नाही.