आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल अग्नीकांडाचा अहवाल मागवला:दिव्य मराठीच्या वृत्तानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती; म्हणाले - आरोपीवर कारवाई व्हावीच

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता त्याला 6 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत असल्यामुळे दिव्य मराठीने ( 6 नोव्हेंबर)ला "अहवाल गुलदस्त्यात "फायर फायटर बसले; पण चाचणीला लागेना मुहूर्त..'असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सिव्हिल अग्निकांड प्रकरणाचा अहवाल मागवला असल्याचे स्पष्ट करतानाच जे कोणी आरोपी आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे सांगितले.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला रविवार (6 नोव्हेंबर) ला वर्ष पूर्ण होत आहे. घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने कागदपत्रे जुळवून तयार झालेल्या अहवालाची फाईल मंत्रालयात सादर केली मात्र या चौकशी अहवालात काय होते ? हे मात्र वर्षभरानंतरही गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान अग्निकांडानंतर अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या फायर फायटर यंत्रणेचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी केवळ चाचणीसाठी मुहूर्त अडला असून, नव्याने तयार होत असलेल्या 60 आयसीयू बेडच्या पक्षाचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी कामाच्या वेग मात्र धिम्माच आहे. याबाबत रविवारी दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर रविवारी अहमदनगरमध्ये आलेले महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रकरणाचा अहवाल आम्ही मागवला आहे असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे असे अनेक घोटाळे आहेत. घोटाळे उघडकीस येण्यापेक्षा ते गुंडाळून ठेवले. सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न अतिशय गंभीर होता. लोकांचे जीव गेले. आम्ही त्याचा अहवाल मागवला आहे. मी स्वतःहा आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. जे कोणी आरोपी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटी निष्काळजीपणाला क्षमा नाही. निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. असे विखे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...