आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चषक स्पर्धा:व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचा एमआयआरसी संघ विजेता ; पोलिस मुख्यालय संघामध्ये अंतिम सामना

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित सद्भावना व्हॉलीबॉल चषक एमआयआरसी संघाने पटकावला. फूटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा २०२२ चा समारोप अहमदनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झाला. एमआयआरसी संघ व पोलिस मुख्यालय संघामध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये गुणांची कमाई करून एमआयआरसी संघ विजयी झाला. फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना युनिट फुटबॉल क्लब विरुद्ध सुमन एंटरप्रायझेस फूटबॉल क्लब यामध्ये झाला. युनिट फुटबॉल क्लबने एक गोल करुन विजय संपादन केले तर द्वितीय क्रमांक सुमन एंटरप्रायझेस फूटबॉल क्लब ठरले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...