आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:माल वितरणातून जमा झालेल्या 2.90   लाख रुपयांचा अपहार; तोफखान्यात गुन्हा दाखल

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कंपनीच्या माल वितरणातून डिलेव्हरी बॉयमार्फत जमा झालेल्या २ लाख ९० हजार रूपये रकमेचा प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयल दाऊत पठाण (रा. बेलदार गल्ली, तेलीखुंट) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कंपनीचे कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे (वय ३३ रा. दत्तवाडी आकुर्डी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस कंपनीमार्फत नगर शहरासह जिल्ह्यात या कंपनीचे शिपमेंट डिलेव्हरी (माल वितरणाचे) काम केले जाते. माल वितरणातून डिलेव्हरी बॉयमार्फत जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब ठेवून ते पैसे सीएमएसमार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणारा सोयल पठाण याच्यावर होती.

त्याने २० ऑक्टोबर रोजी डिलेव्हरी बॉयकडून जमा झालेली २ लाख ९० हजार १९० रुपयांची रक्कम दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी सीएमएस मार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता कामावर गैरहजर राहून रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...