आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामतदार संघाच्या विकासासाठी पैसे आणण्याची कला आशुतोष काळे यांनी चांगली अवगत केली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक निधी मतदारसंघासाठी मिळाला. काळे यांच्यासारखा आमदार होणे नाही, असे गौरवद्गार ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे यांनी काढले. कोपरगाव शहरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१ काेटी २४ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ठाळे म्हणाले, काळे यांच्याकडे असलेल्या नेतृत्व गुणांमुळे तसेच शरद पवार व अजित पवार यांच्या विश्वासाची मोठी शिदोरी त्यांच्याकडे असल्यामुळे कमी वयात साईबाबा संस्थानच्या विश्वत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात जे काही मोजकेच साखर कारखाने कर्जमुक्त आणि प्रगतीपथावर आहेत, त्या कारखान्यांपैकी एक कारखाना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचा कारभार हायटेक असून त्याचे श्रेय हे आशुतोष काळे यांचेच आहे. काळेंनी मागील अनेक वर्षांपासूनचा कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर १५० कोटी शिर्डी विमानतळासाठी आणले आहे. तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी देखील ३ कोटी १९ लाख ८८ हजारांचा निधी आणला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.