आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष:आमदार काळे यांनी वेधले रेल्वेविषयी समस्यांबाबत अपर महाप्रबंधकांचे लक्ष

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव रेल्वे स्टेशन व कोपरगाव विधानसभा मत्तदार संघातील रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना येत असलेल्या अनेक समस्यांबाबत श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी रेल्वेचे अपर महाप्रबंधक बी. के. दादाभोय यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन रेल्वेच्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले व त्याबाबत त्यांना निवेदन देखील दिले. निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशन व रेल्वेच्या बाबतीत अनेक समस्या मांडल्या.

शिरसगाव येथील येथील पादचारी प्रवाशांना कोपरगाव शहरात येण्यासाठी दूरच्या भुयारी मार्गातून यावे लागते. नागरिकांसाठी रेल्वेचा पादचारी मार्ग तयार करून द्यावा. कोपरगाव रेल्वे स्टेशनवर एटीएम मशीन उपलब्ध करून द्यावे. शिंगणापूर ते टाकळी फाटा या रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे काम करण्यासाठी रेल्वेकडून एनओसी मिळावी. प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्वे पूर्ण झाला असून पुढील कार्यवाही करण्यात यावी. यशवंतपूर - निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस व यशवंतपूर - चंदिगढ संपर्क क्रांती एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनला थांबा द्यावा. कोपरगाव रेल्वे स्टेशनवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, भुयारी मार्गात सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईट बसवावे आदी मागण्या केल्या. अपर प्रबंधक दादाभोय यांनी या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी रेल्वे प्रश्नांचे अभ्यासक देवांग बनकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...