आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मंडळाचा झेंडा फडकला आहे. तर दोन ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने (ठाकरे गट) बाजी मारली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख विकास रोहोकले यांच्या मातोश्री लिलाबाई रोहोकले दुसऱ्यांदा भाळवणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजयी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा तालुक्याच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.
वनकुट्याचे मावळते सरपंच राहुल झावरे यांच्या पत्नी स्नेहल झावरे, ढवळपुरीचे मावळते सरपंच डॉ. राजेश भनगडे यांच्या पत्नी विद्या भनगडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये झावरे व भनगडे यांना मतदारांनी धक्का दिल्याचे मानले जात आहे. वनकुट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमनेसामने ठाकल्याने झावरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी सुमन तांबे सरपंचपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्या.
पुणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे यांच्या पत्नी दिपाली रेपाळे या विजयी झाल्या. गावातील सर्व राजकीय कार्यकर्ते विरोधात एकवटले असतानाही रेपाळे यांनी पुणेवाडी ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेल्या १३ ग्रामपंचायतींचे सरपंचपदी विजयी झालेले उमेदवार - ढवळपुरी - नंदा भागाजी गावडे, वनकुटे - सुमन निवृत्ती रांधवन, पळशी - प्रकाश बबन राठोड, पुणेवाडी - दिपाली मारूती रेपाळे, गुणोरे - सुरेश धोंडीबा ढवळे, चोंभूत - कांचन दत्तात्रय म्हस्के, सुनिता गंगाधर शेळके.
म्हस्केवाडी - आशा किरण पानमंद, भोंद्रे - गणेश सुर्यभान झावरे, पिंपळगांव तुर्क - सुलोचना सावकार शिंदे, हत्तलखिंडी - गजराबाई उत्तम गायकवाड, सिध्देश्वर वाडी - शितल संतोष कावरे, पाडळीतर्फे कान्हूर - वैशाली हरिश दावभट, कोहकडी - सिमा अरूण पवार, कोहकडी व म्हस्केवाडी सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने या दोन्ही गावचे मावळते सरपंच अनुक्रमे अरूण पवार व किरण पानमंद यांनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरवले होते. हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
सर्वसामान्य जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस व आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही. मतदारसंघाच्या विकासाची प्रक्रिया अधिक वेग घेईल.''- नीलेश लंके, आमदार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.