आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार लंके यांनी घेतला कबड्डी खेळण्याचा आनंद:युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळावे, शरीरसंपदा टिकवण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील मोरवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिलाच सामना खेळून आमदार लंके यांनी या कब्बडी स्पर्धेचा आनंद घेतला. गेली अनेक वर्षांपासून मोरवाडी ग्रामस्थ कब्बडी स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत युवकांनी मैदानी खेळाच्या माध्यमातून शरीरसंपदा टिकवण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले.

श्री संत सावतामाळी तरुण मित्र मंडळ मोरवाडी व गणराज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या वर्षाच्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन निघोज (मोरवाडी ) येथे करण्यात आले होते पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी या स्पर्धेचे मंगळवारी रात्री उद्घाटन केले.

खेळांना फार महत्व

यावेळी पंच म्हणून टायगर करियर अकॅडमी मिरजगाव चे संचालक हर्षद चौकडे उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले, शारिरीक व्यायाम, शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे आणि ते या मैदानी खेळांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे खेळांना फार महत्व आहे. व्यायामाच्या अभावामुळे दुष्परीणाम सुध्दा दिसायला लागले. या दुष्परिणामांपासून युवा पिढीला दूर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळांचे महत्व समजून घेऊन यामधे भाग घ्यावा असे सांगितले.

कबड्डी जगली पाहिजे

मराठी माणसांनी प्रयत्नपुर्वक कबड्डी खेळातल्या विविधतेतुन आपल्या राज्यात एकता निर्माण केली. कबड्डीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अनेकांनी मेहनत घेतली. पारंपरिक पध्दतीने खेळली जाणारी कबड्डी जगली आणि तगली पाहिजे असे सांगितले.

बक्षिसे प्रदान

यावेळी प्रथम क्रमांक फायनल सम्राट नारायण रसाळ वडगाव सहनी, दुसरा क्रमांक प्रवीण शेठ रसाळ युवामंच रसाळ वाडी, तिसरा क्रमांक एस के स्पोर्ट्स क्लब खेड, चौथा क्रमांक ओम साई कबड्डी संघ जुन्नर या संघाला मिळाला. यात पाहिल्या क्रमांकाचे बक्षीस 22,222, दुसर्‍या क्रमांकाचे बक्षीस 15,555,तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस 11,111,चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 7,777 व इतर उत्तेजनार्थ बक्षिसे सुद्धा प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन अंकुश रसाळ यांनी केले तर सर्व बक्षीसदाते थोर देणगीदार सर्व संघ प्रशिक्षक कबड्डी शौकीन प्रेक्षक व सामन्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मेजर गोरक्ष भांबरे यांनी मानले.

हजारो रुपयांचे बक्षीस

गेली बारा वर्षांपासून मोरवाडी ग्रामस्थ या कब्बडी स्पर्धांचे आयोजन करीत असून हजारो रुपयांची बक्षीसे देत कब्बडी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...