आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्गांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू होते. गेल्या 22 तासापासून लंके अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
अहमदनगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, अहमदनगर- राहुरी-कोल्हार-शिर्डी- कोपरगाव, नगर- मिरजगाव -चापडगाव- करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवार (7 डिसेंबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही लंके यांचे उपोषण सुरूच होते.
गेल्या 22 तासापासून लंके यांचे उपोषण सुरू असून, महामार्गांच्या दुरुस्तीसाठी लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे गुरुवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.
पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी शहर,खरवंडी, मीडसांगवी, करंजी ही प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांसह अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. असे उपोषणाला बसलेले जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांनी गुरुवारी सकाळी सांगितले.
उपोषणाची प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नाही शिवाय वैद्यकीय पथक देखील तपासणीसाठी आले नाही याबद्दल उपोषणकर्ते अॅड. हरिहर गर्जे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावागावात लोक स्वतःहून व्यवसाय व व्यवहार बंद ठेवून या उपोषणाला पाठिंबा देत आहेत असे राजाभाऊ दौंड यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील 70 पेक्षा अधिक गावांमध्ये आज बंद पाळण्यात आला आहे. बुधवारी रात्री उपोषण स्थळी भजनात स्वतः लंके टाळ घेऊन सहभागी झाले होते.
दरम्यान बुधवारी लंके यांच्या उपोषणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सामाजिक संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला.
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (8 डिसेंबर) ला बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासूनच तेथील बहुतांशी व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले. दरम्यान 22 तासांपासून उपोषणावर बसलेले आमदार लंके यांना काहीसा अशक्तपणा जाणवत होता. त्यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक न आल्याने उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.