आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, अहमदनगर- राहुरी-कोल्हार-शिर्डी- कोपरगाव, अहमदनगर- मिरजगाव -चापडगाव- करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी बुधवार (7 डिसेंबर) ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
यावेळी महामार्गांच्या दुरुस्तीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपोषणात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सामाजिक संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला.
महामार्गांची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी मंगळवारी आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आमदार लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, क्षितिज घुले, घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,सामाजिक कार्यकर्ते शाम असावा,अनिल ढोकणे, किसन आव्हाड, चांद मणियार,बंडु बोरुडे, हरिहर गर्जे, सुरेश लगड आदी यावेळी उपस्थित होते. या उपोषणाला विविध संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाम असावा म्हणाले, लोकप्रतिनिधी आहेत की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांची अवस्था कठीण झाल्याने लोक त्रस्त झाले आहेत. नेते हेलिकॉप्टरने येतात पण सर्वसामान्यांचे काय असा सहभाग त्यांनी केला.
योग्य कार्यवाही न झाल्यामुळे हे उपोषण केले
महामार्गाच्या दुरुस्तीबाबत दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाकडून मोघम स्वरूपाची कारणे देण्यात आली आहेत.या रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर लोक त्रस्त असून रस्त्यातील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच अनुषंगाने मागील 2 ते 3 वर्षापासून पाठपुरवा करून देखील संबंधित अधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळेच हे उपोषण केल्याचे आमदार निलेश लंके यांनी निवेदनात सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.