आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतेश राणेंची पत्रकार परिषदेत मागणी:दीपक बर्डेच्या अपहरण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा धर्मांतराच्या प्रकरणांवरून बदनाम होत आहे. श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या मुलाने मुस्लिम समाजाच्या मुलीची विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. अजूनही या मुलाचा तपास लागलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची "आयएस' अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून एसआयटी किंवा सीआयडी चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. अशी माहिती भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

श्रीरामपूर येथे आदिवासी समाजातील दीपक बर्डे अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. माजी मंत्री अशोक उईके, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राणे म्हणाले,अहमदनगर जिल्ह्यात काही काळापासून सातत्याने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन त्या विरोधात लढत आहेत. हिंदू समाजाला टार्गेट करण्याचे काम केले. हिंदू समाजातील मुलं मुलींचं भविष्य अंधारात ठेवण्याचे काम ही जिहादीच्या माध्यमातून सुरू आहे.

आता महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात राहिले नाही. ते सरकार गेले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाहीत. असलम शेख मंत्री नाहीत. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नाहीत. हे पोलीस खात्याने डोक्यात टाकावे, समजावे. राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आहेत. उपमुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी देवेंद्र फडवणीस आहेत.

धर्मांतर प्रकरणात कुठल्याही विभागातील अधिकारी सहभागी झाल्यास तो परत खुर्चीवर बसणार नाही.166 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, विचारावर एकत्रित येऊन स्थापन झालेले हे सरकार आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहत असाल त्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा राणे यांनी दिला. धर्मांतर अथवा अन्य हिंदुत्वाच्या बाबतीत कुठल्याही विभागाचा अधिकारी यात सहभागी झाल्यास तो परत खुर्चीवर बसणार नाही असे त्यांनी सांगितले.

फोन उचलणारे कोणीच राहिले नाही

धर्मांतराच्या प्रकरणात कुणाला जर असं वाटत असेल तर महाविकास आघाडीतील साहेब वाचवतील, फोन करतील. ते होणार नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांचे कोणी फोन उचलणारे राहिले नाहीत. अर्धे लोक आत मध्ये आहेत. असे राणे यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...