आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:सेवा सोसायटीची निवडणुकीत आमदार राजळे यांचे वर्चस्व ; विरोधी गटाने देखिल कडवी झुंज दिली

पाथर्डी शहर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी सेवा सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली.आमदार मोनिका राजळे गटाने यावर एकहाती वर्चस्व मिळवले असले,तरी विरोधी गटाने देखिल कडवी झुंज दिली.सत्ताधारी गटाने १० जागेवर विजय मिळवला असून विरोधकांना एका जागेवर समाधान मानावे लागले.

आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, माजी नगरसेवक रमेश गोरे,बंडू बोरुडे,महेश बोरुडे, बन्सीभाऊ बुचकुल यांच्या पुढाकारातुन खोलेश्वर शेतकरी विकास मंडळाने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत भापकर व विखे गटाचे समर्थक बबन सबलस,दत्ता सोनटक्के,राजेंद्र बोरुडे,आप्पासाहेब बोरुडे आदींच्या पुढाकारातून पार्थनगरी शेतकरी विकास पॅनल यांच्यामध्ये निवडणुक झाली. सत्ताधारी गटाचे मधुकर महाजन तर विरोधी गटाचे सुनिल एडके यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.तर काल झालेल्या निवडणुकीमध्ये संस्थेचे माजी चेअरमन सुभाष बोरुडे,शंकर लबडे,नाना बालवे,अरुण कोकाटे,संजय बोरुडे,गणपत परदेशी,अण्णासाहेब साखरे,खंडूरंग सोनटक्के,मिरा काटे,मंदाकिनी बोरुडे तर विरोधी गटाचे राजेंद्र बोरुडे हे एकमेव उमेदवार निवडुन आले.

बातम्या आणखी आहेत...