आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शहाजी पाटलांचे भाकित:म्हणाले- शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात राज्य प्रगतीपथावर जाणार

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे -फडणवीस सरकार हे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, यात कोणती शंका नाही. या सरकारच्या काळात राज्य प्रगतीपथावर जाणार आहे. जनतेची खंबीर साथ असल्याने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील मंगळवारी पारनेर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांना राजकीय ताकद देणार आहे. हा तालुका शिंदे गटाचा बालेकिल्ला व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहाेत.

पारनेर, सांगोल्याची स्थिती सारखीच

शहाजी पाटील म्हणाले, पारनेर आणि सांगोल्याची भौगोलिक व दुष्काळी परिस्थिती सारखीच आहे दोन्ही मतदारसंघात मेंढपाळांची संख्या मोठी आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सारखाच आहे. आपण सांगोल्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर शिंदे सरकारच्या माध्यमातून 69 कोटी रुपयांचे पाणीयोजना मंजूर केली. या माध्यमातून तेरा गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

पारनेर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सारखाच आहे. या दोन्ही मतदारसंघाचे नेतृत्व कमी पडल्याने पाणी प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. पारनेरच्या शेतीच्या पाण्याचे गाऱ्हाणे राज्य सरकारकडे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

पारनेरला बालेकिल्ला करणार

तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्यात प्रभावी नेतृत्व क्षमता असून सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे काम चांगले आहे आगामी काळात रोहोकले यांना राज्य सरकारच्या माध्यमातून व आपण स्वतःही मोठी ताकद निर्माण करून देणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पारनेर तालुका हा बालेकिल्ला करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

5 दशकांनंतर असाही योगायोग

सांगोला मतदारसंघाचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा राज्याच्या पाणी प्रश्नावर दांडगा अभ्यास होता. पन्नास वर्षांपूर्वी सत्तरच्या दशकात राज्य सरकारने पाणी प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला दिलेल्या अहवालात पारनेरचा प्रश्न,त्यावरील उपाय याबाबत संपूर्ण एक प्रकरण आहे. आता सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार पाटील यांनी पारनेरच्या पाणी प्रश्नाचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...