आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुक्यातील मुळाथडी परिसरातील अंमळनेर येथे मुळा नदीतून वाळू उत्खनन करून वाळू डेपो निंभारी येथे करण्याचा जो शासनाने घाट घातला असून त्याचा ग्रामस्थांसह विरोध करणार असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दिला. वाळू उत्खनन तसेच डेपो त्वरित रद्द करावा, यासाठी मुळा काठच्या गावांनी शासनाच्या विरोधात उपोषण अंमळनेर-करजगाव रस्त्यावरील लक्ष्मी काॅर्नर येथे सुरू केले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी उपोषणास्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना लोकप्रतिनीधी या नात्याने पाठिंबा देऊन तुमच्या मागे ठाम उभा असून मुळा नदीपात्रातील एकही खडा उचलू देणार नसून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला, तर अख्खा तालुका आंदोलनकर्त्यांचा मागे उभा करेल असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. मुळा काठच्या या गावातील अमळनेर निंभारी, खुपटी, तिळापूर, इमामपूर, गोणेगाव, वांजूळपोई, करजगाव, वाटापूर, पानेगाव, मांजरी, खेडले परमानंद, शिरेगाव, वाटापूर, पाचेगाव आदी गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, शेतमजूर सामाजिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले. उपोषणकर्ते संपत किशन पवार वय ७६ यांची तब्येत खालावल्याने अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. आजच्या तिसऱ्या दिवशी परिसरातील गांव बंद आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात आला. चौथ्या दिवशी महिला रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करण्यात येणार आहे. प्रवरेचा तिरी असणारे पाचेगाव येथे आंदोलनला पाठिंबा म्हणून निषेध सभा घेऊन गावबंद ठेवण्यात आले. आम आदमी पार्टी, नेवासे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्तीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
वाळूउपस्याने पाणीटंचाई निर्माण होईल
अमळनेर येथे वाळू डेपोसाठी वाळू उत्खनन झाल्यास अमळनेर, पानेगाव, निंभारी, वाटापूर, इमामपूर, गोणेगाव, शिरेगाव व परिसरातील पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते व शेती उद्ध्वस्त होऊ शकते. शासनाला नेवासे तालुक्यात वाळू डेपो करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे आहे का, असा संतप्त सवाल आंदोलक शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत. तब्बल दहा वर्षांपूर्वीचे वाळूउपसा बंदीचे ग्रामसभेचे ठराव असताना देखील वाळू डेपोच्या नावाखाली वाळू तस्करील एकप्रकारे खतपाणीच घातले जात आहे. याविरोधात तीव्र संताप दिसून येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.