आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:आगामी निवडणुकांत मनसे चांगली कामगिरी करणार, जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांची माहिती

पाथर्डी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांमध्येही मनसेच्या उमेदवारांनी नेत्रदीपक कामगिरी बजावलेली तालुक्याला पहायला मिळेल, असा विश्वास मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनसेचे उत्तर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, जिल्हा सचिव जेम्स साळवे, डॉ. संजय नवथर, शहर सचिव संदीप काकडे, तालुका उपाध्यक्ष एकनाथ सानप, अशोक आंधळे, रंगनाथ वांढेकर, लक्ष्मण डांगे, राहुल लोंढे आदी उपस्थित होते.

१३ मार्च रोजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील महामेळाव्याच्या तयारीसाठी पाथर्डी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह पाथर्डी येथे पार पडली. मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ म्हणाले, मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी शिरसाटवाडी, एकनाथवाडी, शिरापूर, खेर्डे या गावांमध्ये जोरदार कामगिरी केली.त्याच धर्तीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्येही मनसेचे उमेदवार निश्चित मोठ्या संख्येने विजयी होतील. परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे म्हणाले, यापुढील काळात पक्षाचे सर्व पदाधिकारी एकजुटीने कामाला लागणार असून शहर व तालुक्यातील शाखांचे नूतनीकरण करून कार्यकर्त्यांना पूर्ण पाठबळ देत त्यांना सक्रीय केले जात आहे. यावेळी विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओंकार पारखे व शहर अध्यक्ष पदावर प्रथमेश नाकील यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...