आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाची कारवाई:मोबाइल चोराला अटक; 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाची कारवाई

संगमनेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर शहर व परिसरातून मोबाईल चोरी करणाऱ्या अजय सोमनाथ पवार (विंचूर दळवी, ता. सिन्नर) याला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने रविवारी सिन्नर येथून ताब्यात घेतले. त्याचा जवळून बुलेटसह १८ मोबाइल असा ५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पवार दुचाकीवरून येत नागरिकांचे मोबाईल चोरून पलायन करायचा. यानेच मोबाइल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस उपअधिक्षक राहुल मदने यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस नाईक आण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे या पथकाने सिन्नर येथे कारवाई करत अजय पवार याला मुद्देमालासह अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हस्तगत केलेल्या मोबाइलचा शोध घेऊन ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अद्यापही काही मोबाइल धारकांचा तपास लागत नसल्याने त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधिक्षक मदने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...