आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:मोक्का, दरोड्यातील पसार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार त्याच्या वडिलांच्या वर्षश्रध्दाला येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. चंदु ऊर्फ चंद्रकांत भाऊसाहेब घावटे (वय २९, रा. शेळकेवाडी, राजापुर ता. श्रीगोंदे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजाराम चंदर ढवळे (वय ४४, रा. राजापूर) यांची राजापूर शिवारात घोड नदीपात्रालगत शेत जमीन आहे.

ढवळे हे त्यांच्या शेत जमिनीमधील माती विक्री करत असतात. दरम्यान २८ मे २०२१ व त्यापूर्वी संतोष राधू शिंदे (रा. राजापूर) व त्याच्या इतर साथीदारांनी ढवळे यांना वेळोवेळी दमदाटी करून, बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या शेतातील माती बळजबरीने चोरून नेली. या प्रकरणी ढवळे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपींविरूध्द वाढीव मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पसार आरोपी घावटे हा त्याच्या वडिलांच्या वर्षश्रध्दाला येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश इंगळे, अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, विशाल दळवी, शंकर चौधरी, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने राजापूर शिवारात सापळा लावून आरोपी घावटेला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...