आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाला काहीसा विलंब:एमआयडीसी परिसरात पुन्हा मॉकड्रील

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आशा टॉकीज चौकात घेण्यात आलेले दंगलीचे ‘मॉकड्रील’ फेल गेल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने मंगळवारी पुन्हा एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात ‘मॉकड्रील’ घेण्यात आले. यावेळी मात्र, नगर तालुका, भिंगार कॅम्प, तोफखाना, कोतवाली यांच्या पथकासह दंगल नियंत्रण पथक वेळेत हजर झाले. पारनेर व सुपा पोलिसांच्या पथकाला काहीसा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आशा टॉकीज चौकात घेण्यात आलेल्या ‘मॉकड्रील’ मध्ये दंगल नियंत्रण पथकासह बहुतांशी पोलिस ठाण्याची पथके उशिराने घटनास्थळी पोहोचली. या घटनेची अधीक्षक पाटील यांनी गंभीर दाखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले आहेत. दरम्यान, पूर्व सूचना न देता पुन्हा मॉकड्रील घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात ‘मॉकड्रील’ घेतले. यावेळी मात्र शहरातील सर्व पोलिस ठाण्यांची पथके वेळेत हजर झाली.दरम्यान, एमआयडीसी परिसरात दंगा सदृश्य घटनेची माहिती नियंत्रण कक्षातून देण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक सर्वात आधी हजर झाले. त्यानंतर इतर पोलिस ठाण्यांची पथके दाखल झाले. घटनेचा कॉल किती वाजता दिला गेला, कोणत्या पोलिस ठाण्याची पथके किती वाजता दाखल झाली, किती कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचा अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...