आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महाविद्यालयात अल्पवयीन मुलीची छेडछाड व मारहाण; युवा व युवती सेनेची कारवाईची मागणी

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर-शहरातील बोरावके महाविद्यालयात नुकताच मुलीची छेड काढून मारहाणीचा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. याबाबत महाविद्यालय प्रशासनाने तसेच पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवती सेनेच्या जिल्हाध्यक्षा नेहा लुंड (कोकणे) यांनी केली.

बोरावके महाविद्यालयाच्या आतील गेटसमोर सोमवारी सकाळी ११.१५ वाजता एका १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. सदर विद्यार्थीनीने तिच्या बहिणीला सांगितले असता अल्पवयीन आरोपीने पीडितेच्या बहिणीच्या तोंडात चापट मारून शिवीगाळ केली. दरम्यान, विद्यार्थीनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अल्पवयीन आरोपीाविरुद्ध शहर पोलिसात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गैरप्रकाराबाबत युवा सेनेच्या वतीने नेहा लुंड, युवा सेना जिल्हाध्यक्ष नीरज नागरे, शहर प्रमुख किरण लबडे, शाखा प्रमुख शिवा पानसरे, प्रतीक यादव, शंकर लबडे आदींनी अतिरिक्त पोलिस अधिक्षिका स्वाती भोर, निरीक्षक संजय सानप, प्राचार्य डॉ. गायकवाड यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...