आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी अनंत फंदी व्याख्यानमाला:पैसा हे व्यवसायाचे रक्त, ते सळसळतं ठेवल्यास यश; ज्येष्ठ ज्योतिष शास्त्रज्ञ जयेंद्र साळगांवकर यांचे मत

संगमनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायातील पैसा व्यवसायातच कसा वापरतो, यावर व्यवसायाचं गणित अवलंबून असत. पैसा म्हणजे व्यवसायाचे रक्त असत, ते सतत सळसळत ठेवलं तर व्यवसायाची भरभराट शक्य होते. मात्र, दुसऱ्या व्यवसायाकडे वळवताना आपल्याकडे योग्य दिशा व त्याची चौकट असणे आवश्यक आहे. असे नसेल तर आपला निर्णय फसू शकतो. यामुळे आपल्या मूळ व्यवसायाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते, असे मत कालनिर्णयचे निर्माते व ज्येष्ठ ज्योतिष शास्त्रज्ञ जयेंद्र साळगांवकर यांनी व्यक्त केले.

कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना साळगांवकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संगमनेर मर्चंटस् बँकेचे अध्यक्ष ओंकार सोमाणी होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी, स्मिता गुणे यावेळी उपस्थित होते.साळगांवकर म्हणाले, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना वडिल जयंत साळगांवकर यांनी एका भाजी व्यापाऱ्याककडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले. १९७३ मध्ये मुंबईतून कालनिर्णय प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचा काळ संघर्षाचा आणि परिश्रमाचा होता.

कालांतराने हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतून छापले. मराठीतील बहुतेक शास्त्रात सारखेपणा असतो. मात्र, कन्नडचे शास्त्र वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने त्यांच्या ऋषीमुनी, यात्रा-जत्रा यांचा सखोल अभ्यास करुन त्याप्रमाणे छपाई करावी लागते. मराठीच्या कोकण, कोल्हापूर येथील आवृत्तीत कालनिर्णयमध्ये भरपूर शास्त्र समाविष्ट करावे लागते. कधीही ऐकीव माहितीचा ऊहापोह केला नाही. छापली जाणारी प्रत्येक गोष्ट विश्‍वासाच्या कसोटीवर तासूनच घेतली जाते. जत्रा-यात्रा व सणवार याबाबतही पूर्ण खातरजमा करण्याची पद्धत सुरुवातीपासून जोपाल्याचे साळगांवकर यांनी सांगितले.

ज्योतिषशास्त्र समाजाचे आणि मनुष्य प्रवृत्तीचे ज्ञान वाढवण्याकरीता फार उपयोगी आहे. ते एक प्रकारची शक्ती आहे. त्याचा जसा फायदा होतो, तसा तोटाही होतो.कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार सोमाणी यांनी साडेचार दशकांपासून सुरु असलेल्या या व्याख्यानमालेचा उल्लेख करताना कोरोना काळात जनजीवन ठप्प असताना कवी अनंत फंदी प्रतिष्ठानने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करुन विचारांच्या यज्ञात खंड पडू दिला नाही. इंटरनेटच्या युगातही व्याख्यानमालेला रसिकांची इतकी मोठी उपस्थिती संगमनेरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. स्मिता गुणे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...