आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशी विवाह:निघोज येथे एकाच दिवशी झाले शंभर पेक्षा जास्त तुळशी विवाह

पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता शंभर पेक्षा जास्त तुळशी विवाह झाले. मंडळाने गेली ११ वर्षं हा सामुदायिक तुळशी विवाह केला. या तुळशी विवाहाचे पौराहित्य पोपटराव देशपांडे यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, राष्ट्रवादी सोशल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे,माजी सभापती सुदाम पवार, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, दत्तात्रय लाळगे, मळगंगा सामुदायिक तुळशी विवाह मंडळ अध्यक्ष सोमनाथ वरखडे, मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार व पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम कळमकर,माजी उपसभापती खंडू भुकन, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे संघटक ॲड बाळासाहेब लामखडे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्या लंके म्हणाल्या, मळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा हा गावचा नावलौकिक वाढवण्यासाठी आणि धार्मिक संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ वरखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभु श्रीराम भक्त हनुमान यांच्यासमान कार्य केले. गेली ११ वर्षं हे मंडळ सामुदायिक तुळशी विवाह आयोजित करुन एक धार्मिक कार्य करत आहे.

आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. गाव व परिसर त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून गावविकासाचे कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी सात नंतर संगीत भजनी मंडळ कन्हैया पठारवाडी यांचा संगीत भजणी मंडळाचा कार्यक्रम झाला. कन्हैया संगीत भजनी मंडळाचे मार्गदर्शक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उपस्थीतांनी कौतुक केले. सूत्रसंचालन रवी रणसिंग, बबनराव ससाणे यांनी, तर आभार कृष्णा वरखडे, अभिषेक लंके यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...